Taking care of health is everyone’s responsibility – Dr Suraj Salunkhe
Health camp at Nimani
चंद्रपूर :- आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही कितीही धावपळ असली तरी प्रत्येक नागरिकांनी नियमित व्यायाम व संतुलीत आहार घेऊन स्वतःच्या शरीराची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत डॉ सूरज साळुंखे यांनी व्यक्त केले ते अंबुजा फाउंडेशन Ambuja Foundation उप्परवाही प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा व टाटा ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निमणी येथे आरोग्य शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते
यावेळी अध्यक्ष म्हणून संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजूरकर, प्रमुख पाहुणे अंबुजा फाउंडेशन समन्वयक जितेंद्र बैस, डॉ स्वेता देवगडे, डॉ ट्विंकल ढेंगळे, आरोग्य सेवक नारायण निंबाळकर, मुख्यध्यापक बंडू कोंगरे, नर्स नताशा देवघरे, पडवेकर, वैष्णवी सहारे, महादेव मुनावत आदी उपस्थित होते. Health camp at Nimani
जितेंद्र बैस म्हणाले की अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबीर होत असतात प्रत्येक व्यक्तींनी वेळेच्या वेळी तपासणी केली पाहिजे शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात उमेश राजूरकर यांनी सांगितले की चांगले आरोग्य असल्याशिवाय आपण आपले जीवन पूर्णपणे आनंदाने जगू शकत नाही आरोग्य चांगले असेल तर आपले ध्येय निश्चितच साध्य करू शकाल असे मत व्यक्त केले.आरोग्य शिबिरात मौखिक कर्करोग शुगर बीपी गर्भाशय कॅन्सर स्तनाचा कॅन्सर अश्या 178 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन मनीषा गारघाटे तर आभार नारायण निंबाळकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी नेहा जगताप, मीनाक्षी कटाईत, शकू पोयाम, लक्ष्मी पत्रकार, अंजली गायकवाड, पौर्णिमा जाधव, शीला टोंगे, सविता सोयाम, गोपिका टोंगे यांनी प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते