Take the ad-hoc chairman of the Board of Studies as an invited member on the Academic Council and the Research Accreditation Committee; Demand of Gondwana Young Teachers Association
चंद्रपूर :- नवीन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीत अभ्यास मंडळाचे बहुमूल्य योगदान असून नियमित अभ्यास मंडळाच्या नियमित अध्यक्षांची आणि तदर्थ अध्यक्षांची अभ्यासक्रम रचनेमध्ये महत्त्वाची भूमिका असते. मात्र अभ्यासक्रम अंतिम करणाऱ्या विद्या परिषदेमध्ये तदर्थ अध्यक्षांना आमंत्रित केले जात नाही.
अभ्यासक्रमातील विविध अडचणी सोडवण्यासाठी विविध अभ्यास मंडळाच्या तदर्थ अध्यक्षांना विद्या परिषदेवर निमंत्रित करणे महत्त्वाचे आहे. मात्र विद्या परिषदेवर त्यांचा सहभाग नसल्याने त्यांना अभ्यासक्रमा बाबतचे सादरीकरण व बारकावे सांगण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.
त्याचप्रमाणे संशोधन प्रक्रियेत सुद्धा अनेक अडचणी निर्माण झाले असून संशोधन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधन मान्यता समितीमध्ये संबंधित विषयाच्या तदर्थ अध्यक्षांना निमंत्रित सदस्य म्हणून घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे संशोधन प्रक्रिया व त्यामधील विविध टप्प्यांमध्ये गतिमानता निर्माण होईल .गोंडवाना विद्यापीठ परिषेत्रातील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन प्रक्रिया सुलभ होईल त्यामुळे उपरोक्त विद्या परिषदेवर आणि संशोधन मान्यता समितीवर अभ्यास मंडळातील तदर्थ अध्यक्षांना निमंत्रित सदस्य म्हणून घेण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार यांनी निवेदनाचे माध्यमातून कुलगुरूंकडे केली आहे.
यावेळी संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.रुपेश कोल्हे उपस्थित होते.