Monday, November 11, 2024
Homeअपघातचंद्रपुरातील रेल्वे ओव्हर ब्रिज अपघातात दोषीवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन
spot_img
spot_img

चंद्रपुरातील रेल्वे ओव्हर ब्रिज अपघातात दोषीवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

Take action against the culprits in the railway over bridge accident in Chandrapur ; Aam Aadmi Party’s warning of agitation

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम मागील 5 ते 6 वर्षांपासून रखडल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकत्याच दोन महिने आधी एका अपघातात चार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी या अपघातात बांधकाम विभाग तथा टोल कंपनीला दोषी ठरवले. ते म्हणाले की, सदर ब्रिजचे काम पूर्ण करण्याची जिम्मेदारी वरोरा चंद्रपूर बल्लारपूर टोल रोड (WCBTRL) कंपनीची असल्याने टोल कंपनीने याकडे वारंवार दुर्लक्षपणा केले आहे. या सोबतच बांधकाम विभागाने सुद्धा दोषी असलेल्या टोल कंपनीला संरक्षण देण्याचे काम केले आहे.

या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तथा रामनगर पोलीस स्टेशनला पुरव्यासहित तक्रार करून सुध्दा दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

आम आदमी पार्टीकडून प्रशासनासमोर दोषीवरती भादवि कलम 304, 308 अनुसार कायदेशीर कारवाई करणे, अपघातात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना पाच लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देणे, सदर ब्रिजचे काम एक महिन्याच्या आत तात्काळ सुरू करण्यात यावा, सदर ब्रिज पासून तर कामगार चौक पर्यंत सर्विस रोड देण्यात यावे, पोभूर्णा मार्गे येणारी विरुद्ध दिशेची जड वाहतूक तात्काळ थांबवावी, आंबेडकर चौक या ठिकाणी मोठे स्क्वेअर लाईट बसवण्यात यावे अश्या मागण्या ठेवलेल्या आहेत.

कुडे यांनी सांगितले की, या मागण्या 10 दिवसांत पुर्ण न झाल्यास किंवा लेखी स्वरूपात पत्र न दिल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular