Saturday, April 20, 2024
Homeकृषीजंगलातील मानवी हस्तक्षेप कमी करा - हेमामालिनी ; ताडोबा महोत्सव

जंगलातील मानवी हस्तक्षेप कमी करा – हेमामालिनी ; ताडोबा महोत्सव

Tadoba Festival 2024.                                 Reduce human interference in forests – Hema Malini

चंद्रपूर :- मानव सरंक्षित जंगलाला अतिक्रमण करीत आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांना आपले अधिवास करण्यासाठी जागा अपुरी होत असल्याने वन्य प्राणी गावाकडे कूच करत आहेत, त्यामुळे आपण वन्य प्राण्यांचे जंगल सुरक्षित ठेऊन त्यांची जागा संरक्षित ठेवावी असा संदेश जागतिक वन्य प्राणी दिवसाच्या अनुषंगाने चंद्रपुरात आयोजित ताडोबा महोत्सव 2024 या भव्य कार्यक्रमासाठी आले असता चंद्रपूर तुडे शी बोलतांना पद्मश्री पुरस्कार विजेत्या, सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी Hema Malini यांनी संदेश दिला. Tadoba Tiger Project

राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांचे चंद्रपुरात तीन दिवसीय भव्य ताडोबा महोत्सवाचे Tadoba Festival 2024 आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री ड्रीम गर्ल तथा खासदार हेमा मालिनी या कार्यक्रमात ‘गंगा बँलेट’ नृत्य सादर करण्यासाठी आले असता प्रत्रकारांसोबत संवाद साधला.  https://youtu.be/tH99tseh25Q?si=sB8fWrYmycVg-dmP

राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, मत्स व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हेमा मालिनी यांचे चंद्रपूर नगरीत स्वागत करीत भाजपा तर्फे खासदार उमेदवारांच्या पहिल्या यादीत हेमा मालिनी यांचे नाव जाहीर झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या.

जंगलात मानवी हस्तक्षेप वाढत चालल्याने वन्य प्राण्यांचे अधिवास क्षेत्र कमी होत चालल्याने, वन्य प्राणी असुरक्षित अनुभूतीमुळे गावाकडे धाव घेत आहेत त्यामुळे संरक्षित जंगलांची सीमा ओलांडून कोणीही आत प्रवेश करून जंगलात अतिक्रमण करू नये असे आवाहनही हेमामालिनी यांनी यावेळी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular