-
Nature experience successfully completed in Tadoba-Andhari Tiger Reserve: 55 tigers, 17 leopards in core and buffer areas
- चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या Tadoba Tiger Project वतीने बुद्धपौर्णिमेला Buddha Purnima (दिनांक 23 मे 2024 दुपारनंतर ते 24 मे 2024 सकाळपर्यंत) आयोजित निसर्गानुभव उपक्रम यशस्वीपणे सपंन्न झाला.
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भारतातील विविध राज्यांतील निसर्गप्रेमींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. बफर क्षेत्रातील एकूण 6 वनपरिक्षेत्रांतील 79 मचाणी उभारल्या होत्या आणि या मचाणींवर एकूण 160 निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचा-यांच्या सोबत बसून प्राणी गणना केली. याशिवाय कोर विभागातील 5 वनपरिक्षेत्रांतील एकूण 76 मचाणींवर बसून वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना केली.
या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात 26 वाघांची व 8 बिबट्यांची नोंद झाली तर कोर क्षेत्रात 29 वाघांची व 9 बिबट्यांची नोंद करण्यात आली. याशिवाय बफर क्षेत्रात 17 रानकुत्रे, 32 अस्वल, 403 चितळ, 166 सांबर, 344 गवे असे सर्व मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी मिळून एकूण 1977 प्राण्यांची नोंद झाली आहे.
कोर क्षेत्रात 29 वाघ, 9 बिबट, 69 रानकुत्रे, 33 अस्वल, 215 गवा, 1055 चितळ, 322 सांबर असे सर्व मिळून 3092 प्राण्यांची नोंद झाली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून 55 वाघ, 17 बिबट, 86 रानकुत्रे, 65 अस्वल, 1457 चितळ, 488 सांबर, 559 गवे अशा एकूण 5069 मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे. 55 tigers, 17 leopards in core and buffer areas
बफर क्षेत्रात निसर्गप्रेमींच्या सहभागातून, तर वन कर्मचा-यांच्या सहभागातून कोर क्षेत्रात निसर्गानुभव कार्यक्रम सपंन्न झाला.
सदर उपक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक कोर व बफर यांच्या सूचनेनुसार पार पडला.