support of the Block education officer (BDO) to the teacher who defamed the school
◆ किशोर पिसे यांना निलंबित करण्याची शाळा व्यवस्थापन समितीची पत्रकार परिषदेत मागणी
चंद्रपूर :- सिंदेवाही पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगाव येथे मागील काही दिवसांपासून मुख्याध्यापक सागर शंभरकर, शिक्षिका संगीता मधुकर कुंभारे यांच्यात वाद सुरू आहे. दोघांच्या वादातून शाळेला बदनाम केले जात असून, येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सागर शंभरकर यांची बदली करण्यात आली. यानंतर शिक्षिका संगीता कुंभारे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांना नाहक मारहाण करणे, काही नागरिकांना हाताशी धरून गावात तणाव निर्माण करणे, बोगस शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करून मनमर्जी करणे असे प्रकार सुरू असून, त्यांची बदली करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांच्यासह तक्रार करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिसे यांच्याकून अहवाल मागितला. मात्र, पिसे कुंभारे यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप सुभाषचंद्र वीजकापे, प्रेमदास मंडाळे व अन्य सदस्यांनी केला आहे.
मुख्याध्यापक शंभरकर आणि शिक्षिका कुंभारे यांच्या वादात विद्यार्थी भरडला जात आहे. त्यामुळे दोघांच्या बदलीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने निवेदन दिले आहे. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघांचीही बदली केली होती. परंतु, गटशिक्षणाधिकारी पिसे यांनी राजकीय दबावातून शिक्षिका कुंभारे यांची बदली रद्द करून केवळ मुख्याध्यापक यांनाच भारमुक्त केले आहे.
शिक्षिका कुंभारे यांच्या पतीचाही शाळेत हस्तक्षेप वाढला आहे. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांना अपमानीत करणे, गावातील लोकांना गोळा करून तणाव निर्माण करणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे असे कुंभारे यांच्याकडून होत असून, विद्यार्थी प्रचंड दहशतीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे कुंभारे यांचीही बदली करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. पंरतु, गटशिक्षणाधिकारी पिसे हे कुंभारे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सुभाषचंद्र वीजकापे, प्रेमदास मंडाळे, धनपाल मंडाळे, मुकेश मणिराम मंडाळे यांनी केला आहे.