Chandrapur Loksabha Election ; Support for Congress candidate Pratibha Dhanorkar on one side and shock on the other
चंद्रपूर :- चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रात महायुतीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि महाविकास आघाडी उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये चुरशीची लढाई रंगणार आणि यात वंचित बहुजन आघाडी महाआघाडीसाठी रंग मे भंग ठरणार अशी मतदारांत चर्चा आहे. Chandrapur Loksabha Election 2024
महाआघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना जय विदर्भ पार्टी आणि पॉवर फ्रंट कंत्राटी संघटनेने जाहीर समर्थनाची घोषणा केली तर दुसरीकडे काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्षप्रवेश केला. यामुळे काँग्रेस गोटात ‘कही खुशी कही गम’ चे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीच्या चंद्रपूर – वणी -आर्णी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना मतदार संघातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध सामाजिक संघटना प्रतिभाताई धानोरकर यांच्या समर्थनार्थ उभ्या झाल्या आहेत. आता जय विदर्भ पार्टीने एकमताने प्रतिभाताई धानोरकर यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. आपण प्रतिभाताई यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र जय विदर्भ पार्टीने पाठविले आहे. हुकूमशाही विरोधातील लढ्यात आपण खंबीरपणे ताईंच्या सोबत असल्याचे पार्टीने म्हटले आहे, पार्टीचे संस्थापक व अध्यक्ष रमेशभाऊ बिसेन यांनी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया व यवतमाळ ह्या चारही जिल्हयांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व चंद्रपूर जिल्हयाचे कार्यकर्ते यांनी गजानन सभागृह चंद्रपूर येथे मिटींग घेतली. या मिटींगमध्ये प्रतिभाताई धानोरकर यांना पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. पार्टीने केवळ चंद्रपूर जिल्हयात प्रतिभाताई धानोरकर यांनाच पाठींबा द्यायचे ठरविले.
तसेच पावर फ्रंट कंत्राटी संघटनेने पाठिंबा जाहीर करीत हुकूमशाही विरोधातील लढ्यात आम्ही खंबीरपणे आपल्या सोबत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. चंद्रपूर जिल्हयातील पावर फंट कंत्राटी संघटना ही राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत निगटीत आहे. या संघटनेचे मार्गदर्शक श्रीमाननीय शरदचंद्रजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस) असून डॉ. जितेंद्र आव्हाड हे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
या लोकसभा निवडणुकी मध्ये लोकशाही व संविधान जिवंत ठेवण्यासाठी व कामगारांना न्याय देण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील हजारो कंत्राटी कामगार तुमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे. तसे आपणास वचन देतो. असे पावर फंटचे चंद्रपूर शाखा अध्यक्ष युवराज मैंद यांनी प्रतिभाताई धानोरकर यांना पाठविलेल्या पत्राद्वारे पाठींबा दर्शविला आहे.