Saturday, April 20, 2024
HomeCrimeशहरात कायदेशीर "रेती पुरवठा" करा. -आम आदमी पार्टी बल्लारपुर

शहरात कायदेशीर “रेती पुरवठा” करा. -आम आदमी पार्टी बल्लारपुर

Supply legal sand in the city;  Demand of Aam Aadmi Party Ballarpur

चंद्रपूर :- आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 ला
आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे शहरात कायदेशीर रेती पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

मागील तीन-चार महिन्यां पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी रेतीचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होताना दिसून येत नाही, कायदेशीर मार्गाने रेतीचा पुरवठा होत नसल्यामुळे अवैध रेती उपसा करून अव्याच्या-सव्या भावात विक्री करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात कायदेशीर रित्या रेतीचा पुरवठा होत नाही मग अवैध रेती तस्करांद्वारे रेतीचा पुरवठा जोरदार चढ्या भावाने बांधकाम धारकांना कसा काय केल्या जात आहे? या प्रकारामुळे जनतेला रेती करीता जास्त पैसे मोजावे लागत आहे तसेच शासनाला आणि सामान्य जनतेला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे व महसूल प्रशासन याकडे कानाडोळा का करित आहे.? असा प्रश्न रविभाऊ पुप्पलवार यांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात रेती पुरवठ्यातील जो सावळा गोंधळ आहे तो लवकरात लवकर दूर करून वैध मार्गाने नागरिकांना रेतीचा पुरवठा व्हावा अवैध वाळू व्यवसाय तात्काळ बंद करुण बेकायदेशीर वाळू पुरवठादारांना ब्लैक लिस्ट करावे ही समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गंडलेवार सर, शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफ़ज़ल अली, प्रवक्ता आसिफ हु. शेख, सचिव ज्योतिताई बाबरे, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला अध्यक्षा किरण खन्ना, उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, शिरीन सिद्दीकी, साईं गजरेड्डीवार, सतीश श्रीवास्तव, स्मिताताई लोहकरे, मनीषाताई अकोले, रेखाताई भोगे, प्रिया झांबरे, जोत्स्ना जांम्भुळकर, राजू जंगमवार इत्यादी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular