Tuesday, November 5, 2024
HomeAcb Trapलाचखोर अधीक्षकांना अखेर महाबळेश्वर येथून अटक
spot_img
spot_img

लाचखोर अधीक्षकांना अखेर महाबळेश्वर येथून अटक

Superintendent of State Excise Department demanding bribe finally arrested from Mahabaleshwar

चंद्रपूर :- बिअर शॉपीच्या परवानाकरिता एक लाख रुपयांची लाच मागणारे चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून अटक केली. ACB Trap
न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी PCR सुनावण्यात आली आहे.

7 मे 2024 रोजी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात Chandrapur Excise department लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालयातील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक, अभय खताळ यांना एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केली, या प्रकरणात राज उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील याचाही सहभाग असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. Absconding for 7 days

परंतु 7 मे पासून अधीक्षक पाटील फरार होते, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून अधीक्षक पाटील यांना ताब्यात घेतले व अटक केली. या घटनेने राज्यभरात तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंट या नावाने तक्रारदाराचा परवाना आहे. त्याला पुन्हा एक नवीन बिअर शॉपी चा परवाना काढायचा होता, म्हणून 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाकडे रीतसर अर्ज सादर केला होता.

परंतु परवानगी देण्यासाठी टाळाटाळ होत होती. यावरून चेतन खारोडे यांनी तक्रारदाराला हा परवाना मंजूर करण्यासाठी स्वतः करता एक लाखाची लाच मागितली होती आणि अधीक्षकांसाठीही लाच मागितली होती. त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर सात मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती.

जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जवळपास एक हजार दारू दुकानांना परवानगी देण्यात आली, यात कुठलीही अधिकृत तपासणी करण्यात आली नाही. प्रत्येक नवीन परवाना वितरणाची मोठी रक्कम या कार्यालयाद्वारे घेण्यात आली तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्वच दारू दुकानांकडून महिन्याकाठी हप्ता वसूल केल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.

जिल्ह्यातील मद्य परवाना वितरणाची SIT एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Guardian Minister Sudhir Mungantiwar तसेच आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular