Saturday, April 20, 2024
HomeCrimeपोलीस अधीक्षकांनी स्वतः दिली रेती घाटावर धडक ; हायवा, पोकलॅन सह दिड...

पोलीस अधीक्षकांनी स्वतः दिली रेती घाटावर धडक ; हायवा, पोकलॅन सह दिड कोटीचा मुद्देमला जप्त

Superintendent of Police raid on Sand Ghat;  Haiva, poklan machine along with 1.5 crore money seized

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन IPS यांनी अवैध व्यवसायावर चांगलाच फास टाकला आहे, जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुन्हेगारी, रेती तस्करी आदी गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठया प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध्य रेती चोरीवर आळा घालण्या करीता धडक मोहिम हाती घेतली आहे. Sand smuggling

दिनांक.20 मार्च 2024 रोजी रात्रो दरम्यान पोलीस अधीक्षक यांना विश्वसनीय सुत्राकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा अजयपुर गोंडसावरी अंधारी नदीपात्रात ट्रकमध्ये अवैध्यरित्या रेती चोरी सुरू आहे.

यावरून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः पथकासह खाजगी वाहनाने अजयपुर गोंडसावरी अंधारी नदी रेती घाटावर जावून पाहणी केली असता रोडवर संशईतरित्या एक बोलेरो पिकअप गाडी क्र. MH34BF 1809 हि दिसून आली. गाडीमध्ये मोहम्मद शाहरूख इसराईल शेख, वय 36 वर्षे रा. संजय नगर चंद्रपूर हा आढळून आला.

त्यास सोबत घेवून अंधारी नदीचे पात्रात गेले असता रेती भरून असलेले 3 हायवा ट्रक दिसून आले. पोलीसांची चाहूल लागल्याने तिन्ही हायवा ट्रक चालकांनी त्यांचे ताब्यातील हायवा ट्रक मधील रेती नदी पात्रात रिकामी केली. हायवा ट्रक क्र. MH 34 BG 5852,  MH 34 BG 0585, MH 34 BG 5861,  रेतीचे उत्खनन करीता वापरलेले एक KOBELCO कंपनी ची पोकलैंड मशिन आढळून आली, मशीन चालक आकाश गावंडे रा. गोंडसावरी हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला.

तिन्ही हायवा, बोलेरो गाडी, पोकलॅन्ड मशीन चे चालकाने अंधारी नदी पात्रातून रैती गौण खनिजाचे उत्खनन करून 3 हायवा ट्रक मध्ये प्रत्येकी 8 ब्रास अ.कि.5000/-रू. असा एकूण 24 ब्रॉस 1,20,000/- रू.ची रेती चोरी करून, तिन हायवा ट्रक प्रत्येक हायवा 25,00,000/- रू. असे 75,00,000/-रू., बोलेरो पिकअप अ.कि. 5,00,000/- रुपये आणि पोकलॅड मशीन अ.कि. 70,00,000/-रू. असा एकूण 1,51,20,000/-रू.चा माल जप्त करण्यात आला.

नमुद प्रमाणे रेती व रेती चोरी करीता वापरलेले वाहने पंचासमक्ष जप्त करून आरोपी बोलेरो चालक मोहम्मद शाहरूख इसराईल शेख वय 36 वर्षे रा. संजय नगर चंद्रपूर, हायवा चालक श्रावणकुमार लालुप्रसाद पाल वय 28 वर्षे रा.छोटा शिवमंदीर वार्ड, चंद्रपूर, हायवा चालक सुनिल लक्ष्मण जांगडे वय 39 वर्षे रा.मातानगर वार्ड, चंद्रपूर, हायवा चालक सफन सहादेव समाजपती वय 54 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर व पोकलैंड मशीन चालक आकाश गावंडे, रा. गोंडसावरी ता. मुल जि. चंद्रपूर यांचे विरूद्ध पो.स्टे.मुल जि.चंद्रपूर येथे अप.क्र. 118/2024 कलम 379, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन मूल अंतर्गत सुरू आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular