Thursday, November 30, 2023
Homeपालकमंत्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपला - डॉ. अंकुश आगलावे

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपला – डॉ. अंकुश आगलावे

Sudhirbhau Mungantiwar preserved the historical heritage of Maharashtra – Dr.Ankush Aglave                                                                वरोडा:- सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. अंकुश आगलावे, भाजपा जिल्हा महामंत्री ओबीसी यांनी सत्काराप्रसंगी केले.

अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघ नखे लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहातुन भारतात आणण्याच्या सामंजस्य करारवर स्वाक्षरी करून राज्याचे वन व सास्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे वरोरा नगरी ढोल ताशांच्या गजरात गुरूदेव सेवा मंडळ व भारतीय जनता पार्टी वरोच्या वतीने मोठया उत्साहात भव्यदिव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला. Sudhirbhau Mungantiwar preserved the historical heritage of Maharashtra – Dr.Ankush Aglave

सुधिरभाउु हे आमचे मार्गदर्शक व खंबीर नेतृत्व असून त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बनविण्याचा संकल्प यावेळी भाजपा वरोरा शहराच्या वतीेने घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजाचे वापरलेले वस्तु आणण्याचा सौभाग्य प्राप्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे विचारक असून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य सुधिरभाऊच्या हस्ते होत असल्याचे डॉ. आगलावे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीला अ दर्जा मिळवून दिला तसेच अनेक ऐतिहासिक वास्तुंचा जीर्णोध्दार सुधिरभाऊच्या प्रयत्नांने झाले.

डॉ. आगलावे पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजाचे वाघनखे, तलवार तसेच अनेक ऐतिहासिक वस्तु असून क्रम क्रमाने महाराष्ट्रात आणणार आहेत. सामजस्य करार हा तीन वर्षाचा असून महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात प्रदर्शनास ठेवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular