Sudhir Mungantiwar will complain to cybercrime
चंद्रपूर :- काँग्रेसने दंगल घडवून 1984 ला आणीबाणीच्या काळात शीख बांधवांना प्रचंड त्रास दिला, अन्याय अत्याचार केला, सभेतील या वक्तव्याचा अर्धवट व्हिडिओ कट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
या दंगलीत काँग्रेसने किती अन्याय अत्याचार केले हे सर्वश्रुत असताना मीडियामध्ये कुठलाही विपर्यास केलेला नाही. पण काँग्रेस मुद्दामपणे जनतेची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ व्हायरल करने सुरू केले आहे. त्यामुळे याची आपण सायबर क्राईमकडे तक्रार करणार आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करू असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. Sudhir Mungantiwar will complain to cybercrime
आज गुढीपाडवा सण आहे, गुढीपाडवा म्हणजे मांडवस. पूर्वीपासुन शेतकरी बांधव हा सण साजरा करतात. या उत्सवामध्ये आपल्या शेतीत जो वर्षभर प्रामाणिक, उत्तम काम करतो. त्याला आपण मांडवसला पुन्हा वर्षभर काम करण्याची संधी देतो. आणि जो काम चुकारपणा करतो, त्याला कायमची सुट्टी देतो. आपल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा लेखा जोखा बघितला तर विकास कामे झालेली दिसत नाही. त्यामुळे आज मांडवस उत्सव आहे, याच महिन्यात लोकसभा निवडणुक आहे. तुम्ही सर्व मला लोकसभेत पाठवून मांडवसची भेट द्या. आपण माझ्यावर विश्वास ठेवून या मांडवसला लोकसभेत पाठवले तर मी जीव ओतून काम करेल, असे आवाहन भाजपा लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर वरोरा तालुक्यातील सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा आणि बारव्हा येथे प्रचार आणि जाहीर सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी गुढीपाडवा आणि मांडवसचा अर्थ उलगडून सांगितला. ते म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातील आहे. कष्टकरी, शेतकरी, मजूर, बेरोजगार, बेघर, वंचित लोकांसाठी मी जीव तोडून काम करेल. जर मी काम केलें नाही तर मला पण सुट्टी द्या, असे भावनिक आवाहन ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.