Sunday, March 23, 2025
HomeAccidentखासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.

Success to MP Pratibha Dhanorkar’s efforts.

45 lakhs financial assistance to the wife of the deceased in Siddhabali company accident

चंद्रपूर :- ताडाळी येथील सिद्धबली कंपनीत काल दुपारी 4.00 वा. अपघात होऊन अपघातात श्री. श्यामराव बबन ठेंगणे हे मृत्युमुखी पडले. सदर घटनेची माहिती खासदार धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांना होताच त्यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन या प्रकरणी कंपनी दोषी असून मृताच्या पत्नीस मोबदला देण्याची मागणी केली. सदर मागणी आज पुर्ण होऊन मृताच्या पत्नीस 45 लाखांचा मोबदला देण्यात आला.

सिद्धबली येथे दि. 23 जुन रोजी दुपारी 4.00 वा. झालेल्या अपघाता श्री. श्यामराव बबन ठेंगणे यांचा मृत्यू झाला. सदर मृत्यूस कंपनीतील प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला. कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची कुठलही काळजी न घेत असल्याने सदर अपघात घडला असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितल. या अपघाताची तात्काळ माहिती होताच खासदार धानोरकर यांनी कंपनतील अधिकाऱ्यांशी बोलणी करुन आपल्या पदाधिकारी व स्वीय सहायक ला दवाखान्यात पाठविले. 45 lakhs financial assistance to the wife of the deceased in Siddhabali company accident

जोवर मृत्याच्या कुटूंबीयांना आर्थिक मोबदला मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही व कुटूंबीया सोबत राहू अशी भुमिका घेतली. आज सकाळी कुटूंब व कंपनी चे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या समवेत बैठक घडवून आणून मृताच्या पत्नीस 45 लाख रुपये कंपनी तर्फे आर्थिक मोबदला मिळवून दिला.

या प्रसंगी कुटुंबीयाशी संवाद साधून तुमच्या दुःखात सहभागी असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. तसेच सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षेची काळजी घ्यावी याकरीता लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक कामगार आयुक्त व कंपनीतील विविध अधिकाऱ्यांशी बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular