Students of Kalyan College of Nursing conducted awareness on menstruation
चंद्रपूर :- कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग च्या जीएनएम प्रथम वर्षांच्या विद्यार्थीनी प्राचार्य संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले महाविदयालय राजूरा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक विविध महत्त्वपूर्ण माहिती दिली व जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटिल, शिक्षिका एन. बी. गोरे, शिक्षक एन. आर. नुरूवार यांच्या अनुमतीने मासिक पाळी स्वच्छता विषयावर जनजागृती करण्यात आली. यामध्ये मासिक पाळी आल्यावर कोणती स्वच्छता केली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, कापड न वापरता पॅड वापरले पाहिजे आणि पॅड कशाप्रकारे नष्ट केले पाहिजे हि माहिती देण्यात आली.
यावेळी कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, हायस्कूल चे प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.