Students of Infant Jesus English School shone in science quiz competition
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करीत शाळेचे नाव उंचावले आहे.
या स्पर्धेत इयत्ता ८ व्या वर्गातील वेद विजय पिपरवार याने प्रथम स्थान तर इयत्ता ६ व्या वर्गातील सिद्धार्थ मल्लेश बंडा याने तृतीय स्थान पटकाविले आहे.
इस्रो अंतर्गत शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे ही स्पर्धा घेण्यात आली. यात विज्ञान विषयावर आधारित असलेले प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले होते आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने या दोन्ही विद्यार्थ्यांनी अचूकपणे प्रश्नांची उत्तरे देऊन स्पर्धेत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शाळेचे विज्ञान शिक्षक प्रतिभा चून्ने, सुनीता पाटील, सुषमा साळवे, यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.