Saturday, January 18, 2025
HomeMaharashtraआदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी - आमदार सुभाष धोटे

आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी – आमदार सुभाष धोटे

Struggle of tribal society and heroes is inspiring to the world: MLA Subhash Dhote.
Announcement of construction of grand memorial of Veer Baburao Shedmake at Bhendvi

चंद्रपूर :- वीर बाबुराव शेडमाके चौक, भेंडवी येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस International Tribal (Adivasi) Day मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम आदिवासी समाज बांधवांनी वाजतगाजत, लोकनृत्य करीत रॅली काढून जय सेवा आणि आदिवासी अस्मितेचा गजर करण्यात आला. यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांच्या हस्ते आदिवासी महानायक वीर बिरसा मुंडा Veer Birsa Munda यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आदिवासी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला महोत्सव सादर करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात आ. सुभाष धोटे म्हणाले की, आदिवासी समाज निसर्गपूजक, शुध्द पर्यावरणप्रेमी समाज आहे. जगात अनेक स्थित्यंतरे घडत असतानाही आदिवासी समाज आपल्या संस्कृतीला जपत प्रगती करीत आहे. त्यामुळे आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष, आदिवासी संस्कृती जगाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. आदिवासी महानायकांच्या प्रेरणेने समाजाने प्रगती करावे असे आवाहन केले. तसेच भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे १ एकर जागेवर भव्य स्मारक बांधण्याची घोषणाही त्यांनी केली.

या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आकाश भाटीया, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, आदिवासी नेते भेंडवीचे सरपंच श्यामराव पाटील कोटणाके, सोनापूरचे सरपंच जंगू पाटील येडमे, उपसरपंच रमेश मडावी, रामचंद्र कोरवते, बारसुजी आत्राम, विठ्ठल मडावी, गोपाल कोटणाके, रामजी राठोड, युवराज मशाखेत्री, सुरेश जुमनाके, देवराव कोटणाके, लिंबाराव कुमरे, करण मडावी, क्रिष्णा कोटणाके, गोविंदराव मडावी, कर्लु सोयाम, माणकु कन्नाके, आनंदराव सिडाम, यादव मडावी, माजी सरपंच चिन्नुबाई मंडीगा, सुगंधा जुमनाके, तानीबाई मडावी, रेश्मा आत्राम, अंबुजा सिमेंट चे सिद्धेश्वर जंपलवार, युवक काँग्रेसचे उमेश गोनेलवार, आकाश मावलीकर, निरज मंडल, सुधाकर सोयाम सर यासह आदिवासी समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular