Saturday, April 20, 2024
HomeAccidentमद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही

मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही

Strict penal action taken against those driving under the influence of alcohol

चंद्रपूर :- होळी व धुलीवंदन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान मोठया प्रमाणात रंगाची उधळण होते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते.

या कालावधीत काही अतिउत्साही तरूणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभिर अपघात घडुन जिवितहानी होत असते. Strict penal action taken against drink and drive

अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक २२ मार्च २०२४ ते दि.२५ मार्च २०२४ या कालावधीत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही, जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी.  असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. Special campaign of Drunk and Drive

‘तरी होळी व धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जावुन होळीच्या रंगाचा बेरंग होवु नये’ याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे चंद्रपुर पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular