Statement by AAP to MP Pratibha Dhanorkar regarding various problems in Babupeth
चंद्रपूर :- शहरातील बाबुपेठ परिसरातील रखडलेल्या बाबुपेठ रेल्वे ओवर ब्रिजच्या कामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांना AAP आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी तर्फे बाबुपेठ मधिल विविध समस्याचे निवारण करण्याकरिता निवेदन देण्यात आले. Solve various problems in Babupeth
यामध्ये खासदार धानोरकर यांना मुख्यता बाबुपेठ परिसरातील ईतिहासिक असणाऱ्या विहिरीला सुरक्षा जाळी बसवणे, बाबूपेठ मधून बल्लारशाकडे जाणाऱ्या विद्युत वाहक ताराना अंडर ग्राउंड करणे, सिद्धार्थ नगर या ठिकाणी मानपाची जीर्ण अवस्थेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा इमारतीचे नवीन बांधकाम काम करणे, तसेच कासव गतीने सुरु असलेल्या बाबुपेठ ब्रिज चा कामासंदर्भात ठेकेदारावर कामात विलंब करण्याबाबत कायदेशीर कारवाई करणे इत्यादी मागण्याचे यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळेला उपस्थितांमध्ये युवा जिल्हाध्यक्ष राजू भाऊ कुडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, संघटन मंत्री मनीष राऊत, जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, प्रशांत रामटेके, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, हरिदासजी पिंगे, दुर्गे भाऊ इत्यादीची उपस्थिती होती.