Start water supply in Chandrapur city in two days or protest in front of Municipal Corporation – Babytai Uike, Women District President Nationalist Congress Party Sharad Pawar Group
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा मागील पंधरा दिवसापासून सुरळीत होत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी उन्हाळ्याप्रमाणे वन वन भटकावे लागत आहे.
शहरातील अमृत योजना सपशेल फोल ठरली असून अमृत योजनेचे जल हे कंत्राटदराच्या घशात गेले आहे. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून संततधार पाऊस सुरू असून सुद्धा शहरात पाण्याची टंचाई असणे म्हणजे मनपाची कटपुतली भूमिका असल्याचे चंद्रपूर शहरातील नागरिकाचे म्हणणे आहे. NCP Sharad Pawar Group
यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरद पवार गट जिल्हा महिला अध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगर पालिकेचे मुख्य अभियंता बोरीकर यांच्या तर्फे मनपा आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले, पाणीपुरवठा दोन दिवसात मनपाने सुरळीत न केल्यास महानगर पालिके समोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. Start water supply in Chandrapur city in two days or protest in front of Municipal Corporation
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, जिल्हासंघटक सरस्वती गावंडे, जिल्हा सचिव शोभाताई घरडे, नीलिना आत्राम, प्रियोबाला गावंडे, सुषमा डांगे, अमिता गावंडे आदी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.