Monday, November 11, 2024
Homeआमदारमहाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सुरू करा ; प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आ. सुभाष धोटेंना...
spot_img
spot_img

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सुरू करा ; प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आ. सुभाष धोटेंना निवेदनाद्वारे मागणी

Start Maharashtra Police Constable Recruitment;  Trainee students demand through a statement to MLA Subhash Dhote

चंद्रपूर :- पोलीस भरतीसाठी निरंतर प्रशिक्षण व तयारी करून प्रयत्न करणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सुरू करण्यात यावी यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावे अशी विनंती केली आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या गृह विभागात पदे रिक्त असून लवकरात लवकर पोलीस भरतीची कार्यवाही सुरू करण्यात यावी. मागील ३ मार्च २०२३ च्या सामान्य प्रशासन विभागामार्फत २ वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे त्यानुसार ३१ डिसेंबर २०२३ च्या पूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घ्यावे म्हणजे लाखो उमेदवार हे भरतीसाठी पात्र ठरू शकतील अशी विनंती त्यांनी आ. धोटे यांच्याकडे केली आहे.

यावर आ. सुभाष धोटे यांनी संबंधित विभागाकडे तसेच शासनाकडे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर पोलीस भरती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. Start Maharashtra Police Constable Recruitment;  Trainee students demand through a statement to MLA Subhash Dhote

या प्रसंगी बालाजी ताजने, अरविंद मोहुर्ले, नागेश्वर जाधव, विठ्ठल चौधरी, राहुल पिदुरकर, शुभम पिंपळकर, योगेश कांबळे वैभव टोंगे, राहुल सोयाम, किशोर आत्राम, प्रकाश धुळे, आकाश झाडे, अक्षय आत्राम, प्रणय बोबडे, चेतन मोरे, वैभव रागीट, तुषार क्षिरसागर, अनुप आत्राम, वैष्णवी रागीट, शृंखला कांबळे, जयश्री हेपट, शीतल वडस्कर, शेज्वल किंगरे, हर्षदा लालसरे, भाग्यश्री हिरवटकर, अर्पिता तुराणकर, भाग्यश्री बोरकुटे, प्रतीक्षा मोहितकर, अर्शिया पठाण यासह पोलीस भरती चे प्रशिक्षण घेणारे अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular