Start drama course at Gondwana University; Senate member Nilesh Belkhede’s demand
चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली द्वारे नाट्यशास्त्र Drama Science Course विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदनाद्वारे सिनेट सदस्य तथा शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी केली आहे.
गोंडवाना विद्यापीठा Gondwana University Gadchiroli अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने संपन्न जिल्ले आहेत, झाडीपटटी रंगभूमी या दोन्ही जिल्हयात विखुरलेली आहे शिवाय शेजारील गोंदिया व भंडारा जिल्हयात देखील झाडीपटटी रंगभूमीचे नाटके सातत्याने होतात. प्रायोगिक नाटकांची चळवळ सक्रिय आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालयनाव्दारे आयोजीत नाट्यस्पर्धा असो वा, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार राज्य नाट्य स्पर्धा, असो या जिल्ह्यातील नाट्य कलावंत राज्य पातळीवर अग्रणी आहेत करिता ही चळवळ पुढे नेण्यासाठी नव्या पीढीतील तरूण विद्यार्थी यांना नाट्य विषयक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व उत्सुक आहेत. मात्र गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना नागपूर किंवा इतर राज्यातील अन्य ठिकाणी जावे लागत आहे. पर्यायाने आर्थिकद्वया कमकुवत विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून वंचीत राहत आहेत.
करिता नाट्यशास्त्रचा अभ्यासक्रम विद्यापिठात सुरु करावे अशी मागणी सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी कुलगुरू यांना केली आहे.