St. Paul’s College of Nursing celebrates reception and annual convocation
चंद्रपूर :- सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामणी, बल्लारपूर येथे प्रथम वर्ष जि.एन. एम. विद्यार्थिनीच्या स्वागतासाठी स्वागत समारंभ घेण्यात आला.
प्रथम दिवशी कार्यकमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ. गजानन मेश्राम मेडिकल ऑफिसर बल्लारपुर. तसेच सेंट पॉल नर्सिंग कॉलेजचे संचालक अविनाश खैरे, संचालिका नीना खैरे, प्राचार्य प्राची वेलगंधवार, शिक्षिका सोनाली पावडे, निकिता वरकडे, सविता चौधरी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गजानन मेश्राम यांनी विद्यार्थ्यािंना नर्सिंगचे महत्व पटवुन दिले आणि म्हणाले कि, प्रात्यक्षिक शिक्षणावर जास्त भर देउन शिक्षण घ्या. त्यानंतर कॉलेजचे संचालक अविनाश खैरे यांनी विद्यार्थ्यांना म्हणाले की डॉक्टरांपेक्षा नर्सेसला योगदान मिळाले पाहिजे. चांगले शिक्षण घेवुन चांगली नर्स बना.
त्यानंतर प्रथम दिवशी प्रथम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची ओळख करण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यकमाचे संचालन प्रणय मडावी, दामिनी हिने केले.
दुस-या दिवशी वार्षिक संम्मेलनाचा कार्यकम घेण्यात आला. कार्यकमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री प्रविण तळी, सहाय्यक पोलिस निरिक्षक, वर्षा नैताम सहाय्यक पोलिस निरिक्षक, श्री राजु झोडे माजी नगरसेवक तसेच सेंट पॉल नर्सिंग कॉलेजचे संचालक अविनाश खैरे, संचालिका नीना खैरे, प्राचार्य प्राची वेलगंधवार इतर शिक्षिका सोनाली पावडे, निकिता वरकडे, सविता चौधरी उपस्थित होते.
यावेळी वर्षा नैताम यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम Cyber Crime काय आहे ते सांगितले आणि त्यापासुन स्वतः चे रक्षण कसे करायचे हे विद्यार्थ्यांना संगितले. त्यानंतर कार्यकमाला सुरूवात झाली. कार्यकमामध्ये विविध नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यकमाचे संचालन आकंक्षा व ज्योती आणि कार्यकमाचे आभार प्रदर्शन आरती दानव हिने केले.
कार्यकमाच्या शेवटी विधार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.