Spray insecticide to prevent mosquito breeding – Raju Reddy, Congress Leader
◆ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
चंद्रपूर :- घुग्गुस शहरात सध्या सर्वत्र मच्छरांचा प्रकोप वाढला आहे यामुळे नागरिकांना डेंगु मलेरिया सारख्या अनेक जीवघेण्या आजरांना बळी पडावे लागत आहे
तसेच शहरात सध्या रात्रीच्या वेळेस विजेचा लंपडाव वाढला असल्याने घरातील कूलर, पंखे बंद होताच मच्छरांचा जीवघेणा हल्ला होत असते यामुळे नागरिकांना रात्री सुखाची झोप झेणे ही कठीण झाले आहे.

नागरिकांच्या या समस्येवर तातळीने तोडगा काढण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना निवेदनातून संपूर्ण शहरात जंतनाशकाची फवारणी करण्याची मागणी केली आहे