Solve the problems of citizens on priority – MP Pratibha Dhanorkar : Meeting with the officials at the collector office on various issues
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar सरसावल्या असून काल दि. 16 जुलै राजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठकीचे आयोजन करुन नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधिकाऱ्यासमक्ष बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्या अनुषंगाने काल दि. 16 जुलै रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घुग्घुस येथील भुस्खलन झालेल्या नागरीकांना तात्काळ पट्टे मिळण्याच्या संदर्भांने तसेच उसगांव येथील नागरीकांना एसीसी व लॉयड्स मेटल यांच्या मनमानी धोरणामुळे अरुंद रस्ता संदर्भात त्यासोबत कर्नाटक एम्टा मधील उर्वरीत विषयासंदर्भा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Solve the problems of citizens on priority
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घुग्घुस येथे भुस्खलन झालेल्या नागरीकांना तात्काळ जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी भुस्खलन झालेल्या नागरीकांच्या कुटूंबाना पक्के घर तयार होई पर्यंत तीन हजार रुपये किराया वेकोली मार्फत देण्याकरीता वेकोली प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. परंतू वेकोली प्रशासनाने मागील पाच महिन्यांपासून नागरीकांना किराया दिला नसल्याने तो किराया तात्काळ नागरीकांना देण्याकरीता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यासंदर्भात जमिनीचे पट्टे दोन महिन्यांच्या आत देण्यात येईल व वेकोली कडून तात्काळ किराया मिळवून देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच उसगांव येथील एसीसी व लॉयडस् च्या मधोमध जाणाऱ्या रस्त्या संदर्भात गागावकऱ्यांच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी 500 मीटर वळण रस्ता हा अपघाताला कारणीभूत असून दोन्ही कंपनीच्या मध्यस्थीने उसगांव कडे जाणारा रस्ता सरळ मार्गी करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावर तात्काळ निर्णय घेणार असल्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
त्यासोबतच गुप्ता कोल वॉशरी कडून उसगांव कडे जाणार रस्ता देखील तात्काळ दुरुस्त करण्याच्या सुचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कर्नाटक एम्टा मधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन जवळच्या ठिकाणी करण्यात यावे तसेच नौकरी व जमिनीचा मोबदला या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. यावर देखील सर्व प्रक्रिया लवकर पाड पडून प्रकल्पग्रस्तांना लवकरच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीवेळी मा. जिल्हाधिकारी यांच्या समवेत विविध विभागाचे अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, विविध कंपनीचे अधिकारी, वेकोलीचे अधिकारी, गावातील सरपंच, प्रकल्पग्रस्त व समस्येशी संबंधित नागरिक उपस्थित होते.