Tuesday, November 12, 2024
HomeAgricultureजनतेच्या समस्या तातडीने सोडवा : आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
spot_img
spot_img

जनतेच्या समस्या तातडीने सोडवा : आढावा बैठकीत आ. सुभाष धोटेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

Solve people’s problems immediately: MLA Subhash Dhote’s instructions to the officials in the review meeting

चंद्रपूर :- पंचायत समिती गोंडपिपरी येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी विविध विभागांचा आढावा घेतला आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश सर्व विभागांना दिलेत.

यामध्ये तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषी पंपांची विज जोडणी, रस्त्यांची, घरकुलांची कामे पुर्ण करणे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, नाली, गटारे सफाई करणे, धूर फवारणी करणे, जल जीवन ची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे, सुरजसगड च्या जडवाहतुकीत अपघातग्रस्तांना मदत करणे आशा विविध बाबींवर माहिती घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिलेत.

या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकार, गटविकास अधिकारी अरुण चनफने, उपविभागीय अभियंता विनोद खापने, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, पोलीस निरीक्षक हत्तीगोटे, बोरकर, जिल्हा व्यवस्थापक राजु नंदनवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे, सुधाकर राठोड, संदीप मडावी, संतोष चोले, सीडीपीओ गीता कदम, विज वितरण चे सहाय्यक अभियंता तेजप्रकाश लेकुरवाळे, सुनील मुंडे, आकाश ठाकूर, भुमि अभिलेख चे प्र. ग. धकाते, आर. आर. धोंडगे, डॉ. पी. आर. खोब्रागडे, श्रद्धा जयस्वाल, श्रीनिवास कंदनुरीवार, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, उपाध्यक्षा सारीका मडावी, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, पोडसाचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, कृ. उ. बा. स. संचालक शंभुजी येवलेकर, संतोष बंडावार, महिला तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, महेंद्रसिंग चंदेल, अनिल शिंदे, नामदेव सांगडे, गौतम झाडे, समाधान भसारकर, राजु येवलेकर, अनिल झाडे, जितेंद्र गोहणे यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular