Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeEducationalजिवती तालुक्याच्या समस्या सोडवा ; १९ फेब्रुवारी २०२४ पासून भारत राष्ट्र समितीचे...

जिवती तालुक्याच्या समस्या सोडवा ; १९ फेब्रुवारी २०२४ पासून भारत राष्ट्र समितीचे बेमुदत धरणे आंदोलन

Solve basic problems of Jivati ​​Taluka;  Bharat Rashtra Samiti indefinite strike from 19 February 2024

◆ हजारो नागरिकांनो सहभागी व्हा – बी आर एस नेते भूषण मधुकरराव फुसे

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीच्या अनेक आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वाढल्याचे चित्र राजुरा विधानसभा मध्ये दिसून येत आहे.

12 ऑक्टोबर 2023 रोजी जिवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने भव्य जनआक्रोश मोर्चा काढला होता.भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. अब की बार, किसान सरकार या घोषणानी जिवती शहर दुमदुमल होते.

महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली खरी मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्या ही अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते, इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे.

तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार सुरू झालेले नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत जमिनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प, युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, गावात पाण्यासाठी नळ, घरकुल, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, न्यायालय, वसतिगृह, बीएसएनएलचे मोबाईल टावर, पटांगण, व्यायाम शाळा व वाचनालय सुरू करण्यात यावे. जिवती तालुक्यातील वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा उघडण्यात यावी अशा अनेक महत्त्वपूर्ण व रास्त मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे.

जीवती तालुक्याच्या मूलभूत मागण्यांसाठी उद्या पासून सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात जिवती तालूका वासीयांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बि आर एस नेते भूषण फुसे यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular