Monday, November 4, 2024
HomeCrimeचंद्रपूरातील वाढत्या गुन्हेगारीवर ठोस उपाय योजना करा
spot_img
spot_img

चंद्रपूरातील वाढत्या गुन्हेगारीवर ठोस उपाय योजना करा

Plan a concrete solution to the rising crime in Chandrapur Lok Sabha constituency – MP Pratibha Dhanorkar met Home Minister Amit Shaha.

चंद्रपूर :- चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जंगलराज संपुष्टात यावे, अवैध धंद्यांमुळे वाढणारा अग्नीशंस्त्रांचा वापर यावर नियंत्रण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारी वर चर्चा करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अमित शाहा Home Minister Amit Shaha यांची भेट घेतली. Plan a concrete solution to the rising crime in Chandrapur Lok Sabha constituency

वारंवार होणाऱ्या गोळीबारीच्या घटना व निरपराध नागरीकांचे गेलेले जीव यावर देखील खासदार धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार ला आदेश द्यावे, अशी विनंती देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

तसेच देश प्रगतीच्या दिशेने जात असतांना डिजिटल वर्ल्ड Digital World हि संकल्पना समोर आल्याने अनेकजन ऑनलाईन Online Shopping च्या माध्यमातून खरेदी करत असतांना दिसत असतात. हळूहळू सर्व व्यवहार मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये करत असतांना त्यातून ऑनलाईन फसवणूकीच्या घटना घडत आहेत. धावपळीच्या काळात अनेकजन मोबाईल च्या माध्यमातून आपले व्यवहार पार पडत असतात. परंतु याचाच फायदा घेऊन अनेकांना ऑनलाईन फसवणूकीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यासह देशात अनेक गुन्ह्यांची नोंद देखील झाली आहे. अनेक ग्राहकांना चुकीचे कारण सांगुन ओटीपी मागुन ऑनलाईन फसवणूक केली जाते. देशभरात जाने. 2024 ते एप्रिल 2024 या काळात 1750 करोड रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून या संदर्भात 7 लाख 40 हजार तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे खासदार महोदयांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले. MP Pratibha Dhanorkar met Home Minister Amit Shaha

या संदर्भात दोन्ही विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेणार असल्याचे गृह मंत्री अमित शाहा यांनी सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular