Thursday, February 22, 2024
Homeक्राईमविदर्भ आदिवासी विकास परिषदेकडून समाजाची दिशाभूल ; अ.भा. आदिवासी विकास परिषदेचा आरोप

विदर्भ आदिवासी विकास परिषदेकडून समाजाची दिशाभूल ; अ.भा. आदिवासी विकास परिषदेचा आरोप

Society misled by Vidarbha Tribal Development Council ; Allegation of All India Tribal Development Council

चंद्रपूर :- विदर्भ आदिवासी विकास परिषदेचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेशी कोणताही संबंध नसताना विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून वि.आ.विकास परिषद ही अ.भा.आदिवासी विकास परिषद संलग्नित संस्था असल्याचा प्रचार करीत आदिवासी समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश महासचिव केशव तिराणिक, जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

विदर्भ आदिवासी विकास परिषद ही स्वतंत्र संस्था आहे. तिचा नोंदणी क्रमांक वेगळा आहे. तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद हे देशपातळीवर आदिवासींच्या विकासासाठी, अन्याय निवारणासाठी काम करणारी संघटना असून, तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे.

मात्र, विदर्भ आदिवासी विकास परिषदेचेपदाधिकरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी या संस्थेला अ.भा.आदिवासी विकास परिषदेशी जोडून अपप्रचार करीत आहे. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात ओत. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विदर्भ आदिवासी विकास परिषदेने त्यांच्या नावाने जे काही काम करायचे ते करावे परंतु, अ.भा. आदिवासी विकास परिषदेच्या नावाचा वापर करू असा इशारा अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे.

आदिवासी समाजबांधवांनी विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यापुढे अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्यास विदर्भ आदिवासी विकास परिषद विरोधात पोलीस प्रशासन, धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करून कायदेशीर कारवाईची तसेच संस्था नोंदणी रद्द करण्याची मागणी करण्यात येणार, अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी अमृत आत्राम, मधुकर टेकाम, टी.पी.मेश्राम, अरविंद परचाके, परशुराम उईके, पराम मसराम, बलदेव सलामे, महिलाध्यक्ष गीता सलामे, नीलिमा आत्राम, बेबी उईके, पुष्पा सिडाम आदींसह पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular