Saturday, April 20, 2024
HomeCrimeआयशर वाहनात 5 टन गोवंशाचे मांस ; फिल्मी स्टाईलने पोलीसांची कारवाई

आयशर वाहनात 5 टन गोवंशाचे मांस ; फिल्मी स्टाईलने पोलीसांची कारवाई

Smuggling of 5 tonnes of beef in an Eicher vehicle
Police action in film style

चंद्रपूर :- उपविभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर व पोलीस स्टेशन रामनगर Sdpo & Ramnagar Police station यांनी संयुक्त कारवाही करत अवैधरित्या 5 टन (5000 किलो) गोवंशाचे कापलेले मास व टाटा कंपनीचे 1112 आयसर जप्त करुन दोन आरोपींना अटक केली आहे. Chandrapur Crime

अवैधरित्या होण्याऱ्या गोतस्करीवर कारवाही करन्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी दिल्याने उपविभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन रामनगर अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत. वरोरा नाका चंदपुर येथे नाकाबंदी करीत संशयीत वाहनाला थांबवन्ऱ्याचा इशारा केला असता तो पोलीसांना पाहुन गाडी न थांबवता पळु लागला व धोकादायक रित्या गाडी चालवत असता त्यास रोड ब्लॉक करुन थांबवुन सदर वाहनाची पाहनी केली असता वाहनामध्ये प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे बर्फात ठेवलेले दिसले.

यावरून टाटा कंपनीचे 1112 आयसर क्र. MH 40 CT 2069 वाहनातील कापलेले मास व शरीराचे तुकडे हे जनावरांचे / गोवंशाची कत्तल करुन वाहतुक करत असल्याची प्रथमदशर्नी खात्री झाल्याने वाहनातील प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व शरीराचे तुकडे अंदाजे वजन 5 टन अंदाजे किंमत 10,00,000/रू व टाटा कंपनीचे 1112 आयसर किंमती अंदाजे 15,00,000/ असा एकुण 25,00,000/रू चा मुद्देमाल जप्त करुन चालक मोहम्मद राफे कुरेशी, वय १९ वर्ष, रा. भाजीमंडी कामठी जि. नागपुर व सोबती इशाद बबलु टांडी, वय 20 वर्ष, रा. यशोधरा नगर कामठी, जि. नागपुर यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अप.क. 287/2024 कलम 429 भादवि, सहकलम 5(क), 6, 9, 11 महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम 83, 130 /177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पो.उप.नि. अतुल कावळे, पो.ना. लालु यादव, विकास, चालक पो हवा मिलींद, वावळे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular