Six students of Dr. Khatri college in merit list
चंद्रपूर :- स्थानीक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथील पदवी तथा पदव्यूत्तर विभागातील सहा विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शैक्षणीक सत्र २०२२-२३ च्या गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त केले.
यामध्ये बि.एस्सी. च्या गुणवत्ता यादीत श्री. वैभव संजय पाराशर, एम.एस्सी. प्राणीशास्त्र मधून कुमारी मयूरी काळमेघ, एम.एस्सी. पर्यावरणशास्त्र मधून कुमारी ममता रामेश्वर राहीले व कुमारी सावीत्री स्वामी टेकाम तसेच एम.ए. अर्थशास्त्र मधून कुमारी आयशा शरीफ शेख आणि कुमारी प्रिती सुनील कटारे या सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रावीण्य मिळवून घसघशीत यश संपादन केले.
प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा यावर्षीसुध्दा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. विद्यार्थ्यांनी गिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एन.एच. खत्री, सचिव डॉ. एस.बी. कपूर, कोषाध्यक्षा प्रा. अनुश्री पाराशर, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. काकडे सर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले.