Monday, November 4, 2024
HomeAcb Trapकोळसा वॉशरीज मधील भेसळ कोळसा, प्रदुषण ची SIT चौकशी करा
spot_img
spot_img

कोळसा वॉशरीज मधील भेसळ कोळसा, प्रदुषण ची SIT चौकशी करा

SIT inquiry into adulterated coal, pollution in coal washeries                             Samajwadi Party demands at press conference

चंद्रपूर :- चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा वॉशरीज मधील भेसळयुक्त कोळशाचा वापर व हेराफेरी यामुळे होणारे प्रदूषण यासंदर्भात एसआयटी तपास SIT Inquiry करून योग्य ती कार्यवाही करावी आणि पडोली – नागाळा येथील बेकायदेशीर चालणारे कोळसा डेपो संबंधित अभियोग नोटीसची अंमलबजावणी करावी व ते गावा जवळुन हटवण्याची कार्रवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष तनशिल पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना केली असल्याची माहीती श्रमीक पत्रकार संघात आयोजित पत्रपरीषदेत केली. SIT inquiry into adulterated coal, pollution in coal washeries

चंद्रपूर जिल्हयात प्रदूषण संबंधी आजार, न्युमोनिया व श्वसनाचे आजार यामुळे सन 2016 पासून आत्तापर्यंत जिल्हयात 6 हजार 131 लोकांचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. गेल्या 10 वर्षात प्रदूषणामुळे होणाऱ्या टीबीमुळे 887 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 10 वर्षात एकूण 7018 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या MPCB स्थानिक प्रादेशिक कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

प्रदूषण करणाऱ्या कोल वॉशरीज आणि बेकायदेशीर कोळसा डेपोंना नोटीस बजावण्याचाच खेळ सुरू आहे. कारवाईशी संबंधित अनेक माहितीही सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली असे असतानाही विशेष पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळेच आता समाजवादी पक्ष या समस्येला गांभीर्याने घेऊन चंद्रपूर जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यापुर्वीही दोन वेळा ताकीद देऊन जिल्हा प्रशासनाला तक्रारी सदृश निवेदन देण्यात आले होते. परंतु आमच्या विनंतीची योग्य दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता समाजवादी पक्षाने याविषयाकडे जिल्हा प्रशासनाचे ध्यानाकर्षन करण्यासाठी बुधवार 3 जुलैला जिलाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय निषेध आंदोलन करण्यात आले. Samajwadi Party demands at press conference

आंदोलनामध्ये जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर कोल डेपो वर तात्काळ व योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषणासारखे अहिंसक व शांततापूर्ण आंदोलन करावे लागेल असा इशाराही तनशिल पठान यांनी दिला.

Oplus_0

पठान यांच्या नुसार, चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्यात सुरू झालेल्या कोल वॉशरीजमधून येथील वीज उद्योगांना निकृष्ट व भेसळयुक्त कोळसा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे एकीकडे वीज निर्मितीचा खर्च वाढत असताना दुसरीकडे प्रदूषणाची समस्या भीषण बनली आहे. घुघूस -उसेगाव येथील महामिनरल माईन्स अँड बेनिफिकेशन प्रा. लि., वणी – ब्रामणीच्या महामिनरल मायनिंग बीपीएल प्रा. लि., वणी – कळमना कार्तिके कोल वॉशरी प्रा. लि., राजुरा- पांढरपवनी येथील एनएन ग्लोबल प्रा. लि. एसीबी इंडिया, आर्यन वॉशरी, रूकमई वॉशरीज या कोळसा वॉशरींना प्रदूषणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 90 कोळसा डेपो पैकी पडोली-नागाळा येथील 32 कोल डेपा बेकायदेशीर आहे. या डेपोंची ढिसाळ कामगिरी पाहता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या. त्या बंद करण्याच्या आणि खटल्याच्या नोटिसाही दिल्या होत्या. असे असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रदूषणकारी प्लांट व उद्योग तातडीने हटवून बंद करण्याची मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात येत आहे. या कोळसा वॉशरीजमध्ये भेसळयुक्त कोळशाचा वापर, हेराफेरी आणि प्रदूषणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास समाजवादी पक्ष येत्या काही दिवसांत प्रचंड बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पत्रपरीषदेला समाजवादी पार्टी चे शहर अध्यक्ष तनशील पठान, चंद्रपुर महानगर कार्यकारी अध्यक्ष मोईनउद्दीन शेख, युवा जिलाध्यक्ष जुनेद शेख, महानगर उपाध्यक्ष दिलीप यादव, आजाद कांग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अयुब कच्छी, समाजसेवक मो. अनीस आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular