Sunday, March 23, 2025
HomeCrimeघरफोडी, मोटर सायकल चोरीचे आरोपीला सिंदेवाही पोलीसांची अटक

घरफोडी, मोटर सायकल चोरीचे आरोपीला सिंदेवाही पोलीसांची अटक

Sindewahi police arrested accused of burglary, motorcycle theft

चंद्रपूर :- सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या Sindewahi Police Station हद्दीत घरफोडी व मोटार सायकल चोरीच्या घटना उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेत असतांना पीएसआय सागर महल्ले यांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की, सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे याने त्याचा साथीदार आकाश खुशाल सिडाम रा.वडसा याच्या साथीने चोरी केली आहे. burglary, motorcycle theft, Crime

माहितीनुसार आकाश खुशाल सिडाम वय 29 याला वडसा येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबतची माहिती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली सिंदेवाही पोलिसांना दिली असून त्याने सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे रा. राजुरा याच्या साथीने गुन्हे केल्याची कबुली सुद्धा दिली आहे.

सदर गुन्ह्यात आकाश खुशाल सिडाम वय 29 रा. वडसा जि. गडचिरोली यास सिंदेवाही पोलिसांनी अटक केली असुन त्याचेकडुन एम.एच. 34 बी.एक्स 9439, एम.एच. 34 बी.क्यु. 9513 व एक लिनेवो कंपनिचा लँपटाँप याप्रमाणे दोन मोटर सायकल व एक लँपटाप असा एकुण 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Sindewahi police arrested accused of burglary, motorcycle theft

असे एकूण तीन गुन्हे पोलीस स्टेशन सिन्देवाही येथील अधिकारी व अंमलदार यांनी परीश्रम घेवुन उघडकीस आणले आहे.

गुन्ह्यातील एक आरोपी जेल मध्ये असून त्याला ताब्यात घेऊन तपास करून सिंदेवाही पोलीस ठाणे येथील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि सागर महल्ले व पोहवा मधुकर आत्राम, पोहवा गणेश मेश्राम हे करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular