shopkeepers went to the temple and a burglary DB Squad of the city police took it into custody
चंद्रपूर :- दुकानदार घरी नसल्याची संधी साधत घरातून सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरणाऱ्या चोराला चंद्रपूर शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीतील आरोपीला ताब्यात घेत आरोपी कडून 105000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी दिपक रामराज केवट उर्फ भोई वय 32, रा. लालपेठ कॉलरी, चंद्रपूर याला अटक करण्यात आली. Chandrapur Burglary Crime
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन Chandrapur City Police Station हद्दीतील लालपेठ परिसरातील किराणा दुकान व्यावसायिक (दुकानदार) परशुराम रामय्या नमीला दिनांक 19 मे रोजी महाकाली मंदिरात कुटुंबासह पुजापाठ व महाप्रसादाच्या कार्यक्रमाला गेले, रात्रौ 11 वाजता परत आल्यानंतर घराच्या दरवाजा जवळील खिडकी तुटक्या अवस्थेत दिसली, त्यावरून घरात प्रवेश करून पाहिले असता रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिणे असा 65,000 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून दुकान व्यावसायिक परशुराम नमीला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच चंद्रपूर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे सपोनि मंगेश भोंगाळे, पोउपनी नींभोरकर पथकासह घटनास्थळी दाखल होत, घटनेचा कौशल्यपूर्ण तपास करीत गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार आरोपी दिपक रामराज केवट उर्फ भोई वय 32, रा. लालपेठ कॉलरी, चंद्रपूर याला ताब्यात घेत चोरीतील कानातील सोन्याचे वेल, बिर्या, सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, चांदीचा कमरपट्टा असा एकूण 10,5000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.Crime investigation team
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि. निंभोरकर, स. फौ. विलास निकोडे, पो.हवा. महेंद्र बेसरकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो.हवा. निलेश मुडे, म.पो. हवा. भावना रामटेके, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद यांनी केली.