Friday, March 21, 2025
HomeMaharashtra'शिवराज्याभिषेक दिन' शरद पवार विचार मंच च्या वतीने साजरा

‘शिवराज्याभिषेक दिन’ शरद पवार विचार मंच च्या वतीने साजरा

Shivaji Maharaj’s coronation day is celebrated on behalf of Sharad Pawar Vichar Manch

चंद्रपूर :- आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapatri Shivaji Maharaj यांचा 351 वा राज्याभिषेक दिन शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर च्या वतीने आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गिरनार चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भिंतीचित्रक प्रतिमेला शरद पवार विचार मंच चे ऍड. निमेश मानकर यांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देऊन शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Sharad Pawar Vichar Manch

छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक होवून एका सार्वभौम राज्य स्थापित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पदभूषण धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्ररणेने जिवंत बनवली.

स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला होता. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले होते. Shivaji Maharaj’s coronation day

याप्रसंगी शरद पवार विचार म्हणजे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय तुरीले, प्रकाशभाऊ रिंगणे, संतोषजी शेंडे ,वासुदेव डिकोंडवार, कैलास पुराणकर, पंकज ताजणे, सौरभ भावे इत्यादी शिवभक्त उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular