Shiv Sena’s public support for the indefinite strike movement of electrical contract workers
■ कामगारांच्या मागण्या रास्त असून शासनाच्या निदर्शात आणून देवू – चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांची ग्वाही
चंद्रपूर :- विद्युत कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अश्या प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी आज 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले असून यामध्ये शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांना आमंत्रित केले असता सदर मागण्या रास्त असून शासनाच्या निदर्शात आणून देवून मान्य करण्याचे निवेदन मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांना देईल असे मत व्यक्त केले.
महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची स्थापना केली.

कृती समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली असून आज 5 मार्च ला मध्यरात्री पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. आणि जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. अशा भूमिकेवर कामगार ठाम आहेत.