Saturday, April 26, 2025
HomeAccidentअवैद्य दारू विक्री त्वरित बंद करण्याची शिवसेनेची मागणी

अवैद्य दारू विक्री त्वरित बंद करण्याची शिवसेनेची मागणी

Shiv Sena’s demand to immediately stop the sale of undiluted liquor at Khairgaon (Chandsurla) in UrjaNagar Colony area

चंद्रपुर :- ऊर्जानगर वसाहत परिसरातील खैरगांव (चाँदसुर्ला) येथील अवैद्य दारू विक्री त्वरित बंद Illicit liquor करण्यासंदर्भात ग्रा.प. विचोडा सरपंच यांनी दि. 23/1/21, दि.23/7/22, दि.16/8/23, व दि.16/12/23 आणि दि. 24/02/2024 ला राजेश बोचरे यांनी वारंवार पत्र व्यवहार करुन देखील सर्रास अवैद्य दारू विक्री व्यवसाय सुरु असल्यामुळे आज दि. 30 एप्रिल 2024 रोज मंगळवारला Shivsena (Balasaheb Thackeray) शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी व शिवसेना चंद्रपुर उप तालुका प्रमुख बंडू पहानपाटे यांनी पोलिस स्टेशन दुर्गापुर च्या पोलिस निरिक्षक लता वाढीवे यांना त्वरित अवैद्य दारु विक्री बंद करुन समाजाला भितीमुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. Crime

सदर अवैद्य दारु विक्री करणाऱ्या व्यक्तींना कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे खैरगांव (चाँदसुर्ला) व उर्जानगर वसाहतीमधील नागरिक, वयोवृद्धापासुन तर लहान मुलांपर्यंत दारुचे व्यसनाचे प्रमाणे मागील दोन वर्षात जास्तच वाढलेले आहे. त्यामुळे भविष्यात कायदा सुव्यवस्था व शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध दारूमुळे आपल्या कुटुंबाच्या कर्ता व्यक्तिला काही होणार तर नाही, त्यामुळे उर्जानगर वसाहतीमधील लहान मुले, मुली, महीलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. Political

तसेच खैरगांव येथील गेटजवळील अंगणवाडीमधील लहानमुले देखील भितीमध्ये वावरत असून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे अंगवाडी सेवीका व मदतनिस यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे स्थानिकांचे म्हणने आहे. त्यामुळे त्वरित अवैद्य दारु विक्री बंद करुन समाजाला भितीमुक्त करण्याची मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, शिवसेना चंद्रपुर उप तालुका बंडू पहानपाटे यांनी दुर्गापुर पोलिस स्टेशन पोलिस निरिक्षक लता वाडीवे मैडम यांना निवेदनाद्वारे केली. shivsenas demand to stop the sale of illicit liquor immediately

यावेळी ग्रा.पं. विचोडा (रे) सरपंच सौ माधुरी सागोरे , ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीताताई हेलवडे, अंकित धेंगारे, माजी उपसरपंच अर्जुनभाऊ नागरकर, पोलीस पाटील शंकर ताजने, सौ. मायाताई गौरकर, सौ. मायताई नांदेकर, सौ. शशिकला गजभे व सौ. निर्मला खाचने यांची उपस्थिती होती.

सदर निवेदनाची तात्काळ दखल घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मुंबई (म.रा.), पालकमंत्री चंद्रपुर, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, चंद्रपुर व मुख्य अभियंता ,सि. टी. पी. एस. उर्जानगर CTPS यांना सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular