Sunday, April 21, 2024
Homeराजकीयचंद्रपुरात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा - शिवसेना चंद्रपुर संपर्क प्रमुख...

चंद्रपुरात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा – शिवसेना चंद्रपुर संपर्क प्रमुख गंगाधरजी बडुरे

Shiv Sena has worked hard for party growth in Chandrapur – Shiv Sena Chandrapur Contact Chief Gangadharji Badure                                चंद्रपुर :- शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा मुख्यमंत्री मा. ना. एकनाथभाई शिंदे साहेब CM Eknath Shinde यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा. किरणभाऊ पांडव यांच्या नेतृत्वात VIP गेस्ट हॉउस चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपुर येथे बल्लारपुर-चिमूर-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे चंद्रपूर संपर्क प्रमुख गंगाधरजी बडुरे यांनी दशरा मेळावा व जिल्हा आढावा बैठकीत चंद्रपुरात शिवसेना Shivsena पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा, अशा सुचना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या.

या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर- चिमूर-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पक्षाची सध्यास्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार कसा करता येईल व शिवसेना वाढीसाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी विशेष लक्ष कसे देता येईल याबाबत मार्गदर्शन करुन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचे आव्हान केले.

शिवदूत, बुथ प्रतिनिधी व बल्लारपुर-चिमूर-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना युवासेना, महिला आघाडी कार्यकारणी त्वरित तयार करण्यात यावी, अशी मोलाची सूचना केल्यात,. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधि कसे निवडून येईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष कशा मजबूत होईल याचे सविस्तर मार्गदर्शन गंगाधरजी बडुरे यांनी केले.

बैठकीत राजुरा-चिमूर-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे चंद्रपुर जिल्हा प्रमुख बंडुभाऊ हजारे, चंद्रपुर-वरोरा-बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते, महिला जिल्हाप्रमुख सौ. योगिताताई लांडगे, युवासेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाले यांना सूचना देऊन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या लवकरात लवकर कार्यकारणी तयार करण्यात याव्या व जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मी सदैव आपल्या सोबत उभा राहील अशी ग्वाही दिली.

यावेळी सदर बैठकीत राजुरा-चिमूर-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडुभाऊ हजारे, चंद्रपुर-वरोरा-बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते, महिला जिल्हाप्रमुख सौ. योगिताताई लांडगे, युवासेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाले, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख अरविंदजी धिमान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर आशिषभाऊ ठेंगणे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष प्रमुख कमलेश बाळस्कर, बल्लारपुर विधानसभा प्रमुख विनोदभाऊ चांदेकर, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी, चंद्रपुर महानगर प्रमुख भरतभाऊ गुप्ता, बल्लारपुर तालुका प्रमुख जमील शेख, सिंदेवाही तालुका प्रमुख नेताजी गहाणे, पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार, कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड, जिवती तालुका प्रमुख भरत बिरादर, मूल तालुका प्रमुख आकाश कावळे, चंद्रपुर उपतालुका प्रमुख बंडू पहानपाटे , कामगार सेना ctps शाखा अध्यक्ष संतोष ढोक, राजू रायपुरे महिला सेना राजुरा तालुका प्रमुख वर्षा भोयर, चंद्रपुर तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख, महिला आघाडी तालुका प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख, सर्व विभागाचे शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख व शिवसैनिक या आढावा बैठकीला उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular