Shiv Sena has appointed Santosh Parkhi as the Chandrapur Labor District President and Arvind Dhiman as the Chandrapur Traffic District President of Shiv Sena.
चंद्रपुर :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thakare यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या CM Eknath Shinde आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या हस्ते शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांची Worker’s Organization कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. Shivsena
तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख अरविंद धिमान यांची वाहतुक संघटनेच्या Transport Organization चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति करुन दोन्ही जिल्हाध्यक्ष मिळून वाहतुक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांनी निर्देश देवून नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.