Shift operator workers from CMPL Pavani Sakhri to Sasti
चंद्रपूर :- सीएमपीएल पवनी साखरी येथील माती उत्तखनन कंपनीतील (वाल्वो ऑपरेटर) कामगारांना सास्ती येथे स्थलांतरित करा अन्यथा 25 मे 2024 पासून धरणे आंदोलन करणार असा इशारा स्थानिक कामगारांनी केला आहे. CMPL Soil Excavation Company
सीएमपीएल पवनी साखरी येथील माती उत्तखनन कंपनीत स्थानिक वाल्वो ऑपरेटर कामगार सन 2021 पासून कार्यरत असून कंपनीचे कार्य संपल्याचे कारण देत स्थानिक कामगारांना कमी करण्यात येत असून दुसऱ्या ठिकाणी काम मिळाले तर कामावर घेऊ असे पत्राद्वारे आश्वासन कंपनी मार्फत देण्यात येत आहे.
कामगारांच्या माहिती नुसार सीएमपीएल कंपनीला राजुरा विधानसभा क्षेत्रातील सास्ती येथे काम मिळाले असून कंपनीचे काम सुरु झाले आहे करिता सर्व कामगारांना सास्ती येथे स्थलांतरित करून कामावर (कार्यात) घेण्यात यावे अन्यथा कामगार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल करिता कंपनीने कामगारांचा गंभीर्याने विचार करून कामावर घ्यावे, अन्यथा सर्व कामगार मिळून दिनांक 25 मे रोजी धरणे आंदोलन करू आणी याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व शासन प्रशासनाची राहील असा इशारा कामगारांच्या वतीने देण्यात आला. Shift operator workers from CMPL Pavani Sakhri to Sasti
सदर मागण्यांचे निवेदन पालकमंत्री, पोलीस अधीक्षक, वेकोली व्यवस्थापक, कंपनीचे व्यवस्थापक, तहसीलदार व स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आले.