Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeHealthबाबूपेठ उड्डाणपुलाखाली सांडपाण्याचा तलाव ; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

बाबूपेठ उड्डाणपुलाखाली सांडपाण्याचा तलाव ; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

Sewage pond under Babupeth flyover            Neglect of Chandrapur Municipal Corporation Administration

◆ मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर :- बाबूपेठ येथील निर्माणाधिन असलेल्या उड्डाणपुलाखाली Babupeth Railway Overbridge नाल्यातील सांडपाणी साचल्याने उड्डाणपुलाखाली जणू सांडपाण्याचा तलावच तयार झाल्याची स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

कित्येक वर्षांपासून मागणी असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून 4 वर्षांचा कालावधी लोटूनही उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास पोहोचले नाही, यामुळे बाबूपेठ वासीयांना वारंवार बंद होणाऱ्या रेल्वे फाटकाचा त्रास संपुष्टात येईल याचा काही नेम सध्यातरी दिसत नाही आहे.
याच उड्डाणपुलाखालील सांडपाण्याच्या नाल्या तुटलेल्या अवस्थेत असल्याने नाल्याचे वाहणारे सांडपाणी आता उड्डाणपुलाखाली साचत असून तेथे सांडपाण्याच्या तलावाची स्थिती निर्माण झाली आहे.

साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधीचे वातावरण निर्माण आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे, आणि उड्डाणपुलाजवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यास देखील धोका निर्माण झाला आहे.

मनपा प्रशासन Chandrapur Municipal Corporation बाबूपेठ परिसराकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असून या सांडपाण्याच्या प्रश्नांकडेही एवढ्या दिवसांपासून लक्ष देत नाही हे दुर्दैव असल्याची खंत स्थानिक नागरिक करीत आहेत.

मनपा प्रशासनाने उड्डाणपुलाखाली साचलेल्या सांडपाण्याचा प्रश्न आतातरी सोडवावा अशी मागणी स्थानिक बाबूपेठ नागरिक करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular