• Set up industry at Gondpipari midc • Bhushan Phuse’s unique dharna movement with unemployed youth
चंद्रपूर :- गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथे उद्योग स्थापित होण्याकरिता एमआयडीसी करिता शासनाने 40 वर्षांपूर्वी जागा अधिग्रहण केली परंतु आजपर्यंत गोंडपिपरी येथे एकही उद्योग शासन प्रशासन येथे स्थापित करू शकले नाही.
तसेच निवडणुका आल्या की प्रत्येक उमेदवारांच्या घोषणापत्रामध्ये करंजी एमआयडीसी चा मुद्दा असतो परंतु निवडणूक झाल्यावर कुठल्याही जनप्रतिनिधीने आजतागायत या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही करिता गोंडपिपरी तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध नाही, Rising unemployment
तालुक्यात 3 नद्या वाहतात परंतु एकही सिंचनाचा प्रकल्प नाही Irrigation project यामुळे तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे, बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता येथील एमआयडीसी Gondpipari MIDC येथे उद्योग स्थापित करावे यासाठी शासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी बेरोजगार युवकांना घेऊन अनोखे धरणे आंदोलन एमआयडीसी परिसर ते गोंडपिपरी तहसील कार्यालय येथे करण्यात आले. Set up industry at Gondpipari midc

तालुक्यातील बेरोजगार युवकांनी शेळ्या पाळाव्या, विटी दांडू, कंच्या (गोट्या), फुटबॉल खेळावे परंतु बेरोजगार राहावे असे हुबेहूब प्रत्यक्ष शेळ्या, विटी दांडू, कंच्या फुटबॉल तसेच महिलांनी लगोरी चे देखावे दाखवीत दिनांक 9 मे 2024 रोजी शासन व प्रशासनाच्या विरोधात गोंडपिपरी येथील करंजी एमआयडीसी परिसर ते तहसील कार्यालय गोंडपिपरी पर्यंत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनेक बेरोजगार युवक व स्थानिक नागरिकांनी धरणे आंदोलन केले. Dharna Movement
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांचेसह तूकेश वानोडे. वैभव निमगडे. धनराज निमगडे. रामदास मोहरले, दिलीप वासेकर. पप्पू वाळके, शीलवर्धन मुंजनकर तालुक्यातील बेरोजगार युवा, युवती, महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.