Selection of Infant jesus English School students for State Level Science Exhibition
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथिल कुमार कौस्तुभ कार्तिक गेडाम या विद्यार्थ्यांने दिव्यांग गटातून ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये उत्तम कामगिर करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत झेप घेतली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.