Sunday, December 8, 2024
HomeAgricultureअनधिकृत HtBt/चोर बिटी कापूस बियाणे जप्त : कृषी विभागाची कार्यवाही
spot_img
spot_img

अनधिकृत HtBt/चोर बिटी कापूस बियाणे जप्त : कृषी विभागाची कार्यवाही

Seizure of Unauthorized HtBt/ Theft Bt Cotton Seeds :
Proceedings of the Department of Agriculture

चंद्रपूर :- कृषि विभागाच्या भरारी पथकाने पोंभूर्णा तालुक्यातील मौजा जुनगाव येथील गणेश शेषराव आखरे यांचे घरी धाड टाकत संशयास्पद अनधिकृत कापूस बियाणे 17 किलो, ज्याचे मूल्य 32640 रुपयांचे जप्त करण्यात आले आहे. Seizure of Unauthorized HtBt/ Theft Bt Cotton Seeds

पोंभुर्णा तालुक्यातील मौजा जूनगाव येथे कापसाचे अनधिकृत बियाणे htbt साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती कृषि खात्याला प्राप्त झाली यावरून भरारी पथकाने गणेश शेषराव आखरे यांचे पक्क्या घरी तपास केला असता घरात 17 किलोग्राम संशयास्पद अनधिकृत कापूस बियाणे आढळून आले. यावरून कृषि विभागाच्या भरारी पथकाने अनधिकृत चोर बिटी HtBt बियाणे 32640 रुपये जप्त करण्यात आला आहे. Action of Department of Agriculture Chandrapur

याप्रकरणी गणेश शेषराव आखरे रा. जूनगाव व जनार्दन नागाजी घोडे रा. देवाडा बु. यांचेवर अनाधिकृत बियाणे बाळगणे, विक्री करणे बाबत पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर तथा विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर शंकरराव तोटावार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर वीरेंद्र राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा पंचायत समितीचे कृषी अधिकारी नितीन धवस, मंडळ कृषी अधिकारी संतोष कोसरे, कृषी पर्यवेक्षक नेताजी वाकुडकर, मूल पोलीस स्टेशनचे पोहवा सुनील कुळमेथे यांनी केली. Chandrapur Today

अनधिकृत HtBt कापुस बियाण्यास शासनाची परवानगी नाही. परंतु छुप्या मार्गाने हे बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक केली जाते. जर सदर बियाणे उगवलेच नाही तर शेतकऱ्यांना त्याबाबत दाद मागता येत नाही व त्याचा पूर्ण हंगाम वाया जातो तसेच जमिनीवर व पर्यावरणावर देखील दुष्परिणाम होतो. Appeal from Agricultural Dept.

कृषि विभागाने अनधिकृत बियाणे वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेता कडूनच बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक खरेदी करावे व खरेदी केल्याची पक्के बिल विक्रेत्याकडून शेतकऱ्यांनी घेऊन जपून ठेवावे तसेच अनधिकृत बियाणे खरेदी करू नये, जर तालुक्यात संशयास्पद अनधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर कृषि विभागाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular