Scout Guide Workshop at Kamaladevi College of Education
चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे स्काऊट गाईड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर व प्रमुख मार्गदर्शक मा. किशोर उईके (सहा. शिक्षक) भवानजी भाई हायस्कूल, चंद्रपूर मा. रजंना किन्नाके (सहा. शिक्षिका) भवानजी भाई हायस्कूल, चंद्रपूर यांची उपस्थिती होती. मान्यवरानी बॅडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूष्प अर्पण करून अभिवादन केले, मान्यवरांचे स्वागत प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे यांनी पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून केले.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शकांनी बी. एड. अभ्याक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षीय छात्राध्यापक व छात्राध्यापिकांना स्काऊट गाईड बद्दल योग्य मार्गदर्शन केले. तसेच स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास, तत्वे, वचन, नियम, उद्देश व खेळाविषयी माहिती दिली व प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका शमिना अली यांनी केले तसेच संचालन छात्राध्यापिका अश्लेषा गोवर्धन व आभार प्रदर्शन गौरव चौधरी यांनी केले.
प्राध्यापिका वनिता हलकरे, प्राध्यापिका सूचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपूडके, प्राध्यापिका डॉ. जयमाला घाटे, प्राध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्यापक राजकुमार भगत, तसेच ग्रंथपाल श्री. चंदन जगताप, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग श्री. मोरेश्वर गाऊत्रे, श्री. विजय बाळबुधे उपस्थित होते.