Sunday, December 8, 2024
Homeदेशविदेशचंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
spot_img
spot_img

चंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Savitribai Phule Jayanti celebrated by Chandrapur City Mahila Congress

चंद्रपूर :- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले,

यावेळी सौ चंदाताई वैरागडे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून सावित्रीबाई फुले नि त्याकाळच्या चूल आणि मूल ही प्रथा मोडीत काढून आपले पती क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांसाठी पुण्यात शाळा सुरू करून स्वतः शिक्षिका मनून कार्य केले,हे कार्य करत असताना त्यांना अनेक हाल अपेष्टा ,रस्त्यांनी जाताना लोकांनी शेंनगोळे मारले परंतु त्या डगमगल्या नाही आणि आपले काम सुरळीत सुरू ठेवले त्यामुळे आज आपण मोठ्या ताठ मानेने समाजात वावरत आहे,त्यांचा आदर्श सर्वानी आपल्या डोळ्यासमोर ठेऊन कार्य करावे तरच आपण खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी केली अस मनता येईल असे मौलिक विचार मांडले,

याप्रसंगी कार्यक्रमाला योग शिक्षिका रेखाताई वैरागडे, संगिता टवलारकर,अपर्णा धकाते,वैशाली ऐसेकर,संगीता वैरागडे,स्नेहल अंबागडे,शिल्पा आंबटकर,तृप्ती राजूरकर ,रितिका पोहाणे ,वंदना खेडकर,प्रियंका खनके,प्रीती कामडे, लीला बुटले, चंदा कन्नमवार,दीपाली शेंडे, शुभांगी कंदलवार,उजवला कार्लेवार,शुभांगी येनूरकर ,संगिता देठे, संगिता चिडे,वर्षा साखरकर,सुरेखा बुटले,ज्योती पोटदुखे, सुषमा पोटे,राणी लेडांगे,कविता बावणे, नम्रता मोरे,रुपाली बुटले,उषा तंगडपल्लीवार,इत्यादी महिला उपस्थित होत्या

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular