Monday, March 17, 2025
HomeLoksabha Electionसंतोष रावत यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे बल्लारपुर विधानसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग

संतोष रावत यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे बल्लारपुर विधानसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग

Defeating the Congress District President, Santosh Rawat is fielding for the Ballarpur Assembly ticket with State President Nana Patole.

चंद्रपूर :- चंद्रपुर काँग्रेस जिल्हाध्यक्षांना डावलून संतोष रावत गट यांची गडचिरोलीच्या काँग्रेस नेत्याला हाताशी धरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे बल्लारपुर विधानसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावली असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच 7 जुलै 2024 रोजी मुल च्या संतोष रावत गटाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress State President Nana Patole यांची भेट घेतली.

लोकसभेच्या ऐतिहासीक विजयामध्ये या विधानसभेत घेतलेल्या लक्षणीय मताधीक्याने विधानसभेच्या तिकिटासाठी मूल – बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु असताना संतोष रावत गटाने जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना डावलुन गडचिरोलीच्या एका काँग्रेस नेत्याला हाताशी धरून नाना पटोले यांची भेट घेतली, हा जिल्हाभरामध्ये आता चर्चेचा विषय झालेला आहे.

नुकत्याच झालेल्या पोंर्भुणा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या निवडीवरून संतोष रावत गट आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे Congress District President MLA Subhash Dhote यांच्यामध्ये बराच कलगीतुरा रंगला, तालुका अध्यक्षाच्या निवडीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वासुदेव पाल यांच्या नावाला उघड उघड विरोध करत पत्रकार परिषद घेउन सामुहीक राजीनामे देण्याची धमकी देत जिल्हा काँग्रेस कमीटीला जेरीस आणले होते.

Oplus_0

आता संतोष रावत गटाला जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे दुसऱ्याच एका उमेदवाराला पाठीशी घालत असल्याची भनक लागली आणि म्हणून संतोष रावत गटाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली अश्या चर्चेला जिल्हाभरामध्ये ऊत आला आहे.

या गटातटाच्या राजकारणाच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीही कडक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांना 6 वर्षा करिता निलंबित केले होते,

त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय भूमिका घेणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular