Saturday, April 20, 2024
Homeआमदारसंत सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी - आमदार सुभाष धोटे ; आ. सुभाष...

संत सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी – आमदार सुभाष धोटे ; आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बामणवाडा येथे बंजारा समाज भवनाचे भुमिपूजन.

Sant Sewalal Maharaj’s work is inspiring – MLA Subhash Dhote;  come  Bhumipujan of Banjara Samaj Bhawan at Bamanwada by Subhash Dhote

चंद्रपूर :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत तपस्वी संत श्री. सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चंद्रपूर आमदार निधी सन २०२३ – २०२४ अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा बामणवाडा येथे वार्ड क्रमांक १ मधील शासकीय खुल्या जागेवर बंजारा समाजाचे समाज भवन बांधकाम करणे अंदाजे किंमत २० लक्ष रुपये निधीच्या विकासकामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की संत सेवालाल महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. प्राणिमात्र , मनुष्य समाजाचे कल्याण कसे होईल , यशस्वी जिवन कसे जगावे याची अनमोल शिकवण त्यांनी दिली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बामणवाडा चे सरपंच भारती पाल, प्रमुख अतिथी उपसरपंच अविनाश टेकाम, गनपत चव्हाण, ग्रा. प. सदस्य सर्वानंद वाघमारे, सुजाताताई मेश्राम, समीक्षा झाडे, प्रफुल चौधरी, राकेश वाघमारे, प्रकाश जाधव, प्रभाकर चव्हाण, हरिश्चंद्र राठोड, प्रमोद साळवे, राजेश्वर चव्हाण, कल्पनाताई राठोड, अंबादास राठोड, आर जी पवार, अनिल राठोड, बहिणाबाई राठोड, दत्ता चव्हाण, एन डी जाधव, गणपत जाधव, दयानंद पवार, विजय राठोड, यासह तपस्वी संत श्री सेवालाल महाराज सेवा समितीचे पदाधिकारी, समाजबांधव, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. प. सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी केले, आभार नामदेव जाधव यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular