Saturday, January 17, 2026
HomeCrimeशहरात रेती तस्करी व घरफोड्यांच्या प्रमाणात होतेय वाढ,

शहरात रेती तस्करी व घरफोड्यांच्या प्रमाणात होतेय वाढ,

increase in sand smuggling and burglaries in Chandrapur, police administration needs attention:
Statement of Raju Kude to Ramnagar Police Station

चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाढवळ्या रेती चोरी होत आहे इतकेच नाही तर अमली पदार्थ सेवन करणारे अल्पवयीन मुले घरफोड्या करत आहे. घरासमोरील वाहने चोरीला जात आहेत. सध्या शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतांना कोणाचेही याकडे लक्ष नाही. पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. Chandrapur Crime

या बाबत आपचे युवा नेते राजू कुडे यांनी स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनला एक निवेदन सादर केले आहे. शहरातील गुन्हेगारीला तातडीने आळा घालण्याची मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे. sand smuggling and burglaries in Chandrapur

निवेदन देते वेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक महानगरचे अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष जावेद सय्यद, व प्रशांत रामटेके उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular