Salutations to Rajmata Jijau and Swami Vivekananda by Mahila Congress
चंद्रपूर :- राजमाता जिजाऊ राणी साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तथा राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राजुरा महिला काँग्रेस द्वारा राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले.
इंदिरा जिनींग राजुरा येथे पार पडलेल्या या जयंती कार्यक्रमप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, यु. काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, पुनम गिरसावळे, इंदूताई निकोडे, नमिता भटारकर यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.