Saturday, April 20, 2024
HomeCrimeचंद्रपूर शहर व रामनगर पोलीसांचे शहरात रूट मार्च

चंद्रपूर शहर व रामनगर पोलीसांचे शहरात रूट मार्च

Route march of Chandrapur City Police and Ramnagar Police in the city

चंद्रपूर :- पोलीस ठाणे चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला. Police Root March

25 फेब्रुवारी रोजी मुस्लिम बांधवांच्या शब-ए- बारात (बळी रात) सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था दृष्टीने उपविभागीय अधिकारी राजुरा तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश मुळे व सुनील गाडे, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी रमिज मुलाणी यांचे उपस्थितीत पोलीस ठाणे चंद्रपूर शहर व पोलीस स्टेशन रामनगर चे संयुक्त विद्यमानाने पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नेहरू स्कूल, घुटकाळा, बिनबा चौक, बिनबा गेट ते रामनगर हद्दीतील रहमत नगर, मुस्लिम बहुल वस्तीत मुस्लिम कब्रस्तान या मार्गावर मार्गावर दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी रुट मार्च घेन्यात आला. Route march of Chandrapur City Police and Ramnagar Police in the city

रुट मार्च मध्ये रामनगर व चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, अधिकारी पो.स्टे.चंद्रपूर शहर, रामनगर RCP पथक, सी – 60 पथक, होमगार्ड पथक असे एकूण 90 अंमलदार व 38 होमगार्ड सहभागी होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular